मुंबईतील एका क्रुझवर एनसीबीचा छापा; अनेकजण जाळ्यात

0

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक करून कारवाई सुरू आहे. अशातच मुंबईतील एका मोठ्या क्रुझवरएनसीबीने छापा टाकला आहे. या क्रुझवरून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एका मोठ्याअभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात  Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंतघरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्यापथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला.

या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतलेआहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. एनसीबीच्या पथकाकडून अजून छापे सुरू आहे. लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहेपहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडूनही कारवाई करण्यात आली आहे.

या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने हीड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठेव्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे.

NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. आतापर्यंत या कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आलेआहे. अजूनही चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.