free forced sex clips sex clip free download free sex las vegas free sex videos to download sex video free family

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

0

पुणे : सिनेमाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला इलेक्ट्राॅनिक पडदा (स्क्रीन) अचानक अंगावर पडून 3 लहान मुले जखमी झाल्याची घटना सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावतीमध्ये तळजाई वसाहतीत शुक्रवारी रात्री घडली होती. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप तसेच एका टेम्पोचालकाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट नगरसेवकास जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रांजल विजय आदमाने (6), अनुष्का विशाल रणदिवे ( 6), सौरभ जालिंदर पाटोळे (7, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेला जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप तसेच एका टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष कराड यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तळजाई वसाहतीत एका सिनेमाच्या प्रदर्शनासाठी इलेक्ट्राॅनिक पडदा लावण्यात आला होता. पडद्याला विद्युत पुरवठा करण्यासाठी एका रोहित्रातून बेकायदा वीजजोड  घेण्यात आली होती.

दरम्यान, एका टेम्पोने पडद्याला धडक दिली त्यानंतर पडदा कोसळला. पडद्याच्या समोर बसलेली तीन लहान मुले जखमी झाली. जखमींपैकी एका लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अशी माहिती समोर आली आहे.

नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.