पंजाबच्या निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला

0

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवार दि. १७ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. १४ फेब्रुवारीला पार पडणा-या या निवडणुका आता २० तारखेला होतील. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. १४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढे ढकलण्याची मागणी भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, भाजप आणि बसपा यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र लिहिले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती आहे. पंजाबमध्ये लाखो भाविक त्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातील. अशा स्थितीत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी पत्राद्वारे केली होती. याशिवाय भाजप आणि अमरिंदर सिंग यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयोगाची बैठक पाडली. अखेर १४ फेब्रुवारीला होणा-या निवडणुका २० फेब्रुवारीला पार पडणार आहेत आणि मतमोजणी ठरल्याप्रमाणे १० मार्चला होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.