डिझेलच्या दरात विक्रमी वाढ; शतकाकडे वाटचाल !

0

पुणे : तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भाववाढ केली आहे. महाराष्ट्रात बंद सुरु असला तरी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ बंद झालेली नाही. त्यात डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात आतापर्यंत ३२ पैशांनी वाढ होत होती.

सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे २९ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर १०९.९१ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात प्रति लिटर सर्वाधिक ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर ९९ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलही लिटरमागे २९ पैशांनी महागले आहे़ पॉवर पेट्रोलचा दर आता ११३.५९ रुपये लिटर झाला आहे. ही दरवाढ कधी थांबणार याची जनता आतूरतेने वाट पहात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने मध्यमवर्गीय, गरीबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.