परदेशातून महाराष्ट्रात आलेले सहा प्रवासी करोनाबाधित

0

मुंबई : महाराष्ट्र राज्यात दक्षिण अफ्रिके सोबतच इतर देशातून आलेले सहा प्रवासी आता करोनाबाधित आढळून आलेले आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर म.न.पा. आणि पुणे या भागात अफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी करोनाबाधित आढळला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत नायजेरियातून आलेले दोन जण करोनाबाधित आढळले आहेत. सदर प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले असून सदर माहिती आरोग्य विभागाने दिलीय.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमिक्रोन आढळून आला आहे, असे 11 देशांपैकी जे काही प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची RTPCR टेस्ट करण्यात येत आहे. जे बाधित आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी बाधित आढळणार नाहीत त्यांचेही विलगीकरण केले जाईल. सात दिवसानंतर पुन्हा RTPCR टेस्ट केली जाईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी COVID बाधित आले आहेत. त्यांचे नमुने देखील N.I.V पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

There are 6 pax who arrived from South Africa or other high-risk countries & tested positive for COVID – one each in Mumbai Corporation,Kalyan-Dombivali Corporation, Meera-Bhayandar Corporation & Pune, 2 from Nigeria in Pimpri-Chinchwad corporation: Public Health Dept Maharashtra pic.twitter.com/vrtYMMc9P6

— ANI (@ANI) November 30, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.