एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर बंदूक रोखली

0

पिंपरी : शहरात केवळ एक हजार रुपयांसाठी गुंडाने दुकान मालकावरच बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्राहकांदेखतच हा संतापजनक प्रकार घडला असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अन्य एका महिलेसोबत देखील त्या गुंडाने असाच प्रताप केल्याचं समोर आलं आहे. हफ्ते वसुली अर्थात खंडणीखोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत ही कैद झालाय. सराईत गुन्हेगार देवा जमादारने 10 जानेवारीला गहूंजे गाव या ठिकाणी हा प्रताप केला.

रात्री पावणे दहा वाजता तो किराणा मालाच्या दुकानात घुसला. ग्राहक उपस्थित असतानाच कंबरेची बंदूक बाहेर काढली, ती लोड केली आणि दुकान मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. हे पाहून ग्राहकांनी दुकानातून काढता पाय घेतला. 

अवघ्या एक हजार रुपयांसाठी त्याने हे कृत्य केलं. बिहार स्टाईलने त्याने धाडस केल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर त्याने आणखी एका महिला व्यावसायिकेला पैशासाठी धमकावले.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे आणि देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देवा जमादारवर या पूर्वीच दरोडा, चोरी आणि शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.