डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन मागे

0

मुंबई : बळजबरीने खंडणी वसून केल्याप्रकरणी गेल्यावर्षी ठाकरे सरकारने निलंबित केलेले पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या निलंबनासाठी राज्याच्या गृहविभागान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सही करत 22 मार्च 2022 रोजी त्रिपाठी यांचे निलंबन करण्यात आले होते.

त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते.16 मार्च 2022 रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना फरार घोषित केले. त्रिपाठी यांच्याविरोधात पुरावे पोलिसांना सापडले होते. दरम्यान, डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करुन तक्रार मागे घेण्यासही सांगितले होते. यासंबंधिच्या ऑडिओ क्लीपही मुंबई पोलिसांच्या हाती लागली होती.

दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. या याचिकेत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. एफआयआरमध्ये आपलं नाव नसून पोलीस स्टेशनकडून अंगाडियाकडून वसूली केली जात असल्याची माहिती आपल्याला नव्हती.

प्रकरणात गुन्हे शाखेकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. यांपैकी 3 जण पोलिस अधिकारी होते. अटक झालेले पोलिस निरिक्षक ओम बंगाटे यांच्या चौकशीतून डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे नाव समोर आले. त्यानंतर त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.