sex doll movie free free sex family movies online hookup ireland hookup app reddit full free sex video download

‘कोविशिल्ड’चे दोन डोस घेतलेल्याना ओमायक्रॉनच्या धोका कमी

0

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. यातच एक नवे संशोधन समोर आले आहे. भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस यावर प्रभावी ठरेल अस संशोधकांचे मत आहे.

जगभरात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात जगभरातील 7 कंपनीच्या लसींच्या बूस्टर डोस (Booster Dose) घेतलेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रतिकारक क्षमता निर्माण झाल्याचं निरीक्षणात नोंदवण्यात आलं आहे. या 7 लसींमध्ये कोविशिल्ड लसीचा समावेश आहे. ही लस ऑक्‍सफर्ड-एस्ट्राजेनेका या भारतील कंपनीनं तयार केली आहे. भारतामध्ये कोविड लसीकरणात कोविशिल्ड लसीचा वापर सर्वात जास्त झाल्यामुळे भारतीयांसाठी ही आनंतदाची बातमी आहे.

ब्रिटनमध्ये कोविशिल्ड किंवा फायझर (pfizer) ची कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात लसीचे दोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोस देऊन निरीक्षण करण्यात आलं. याआधीच्या संशोधनात असं सिद्ध झालं होतं की, कोविशिल्ड आणि फायजरची लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत प्रतिकारक क्षमता वाढवण्यात प्रभावी आहे. अनेक लसनिर्मिती कंपन्या लसीचा बूस्टर डोस देण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, लस घेतल्यानंतर काळानुसार लसीची प्रभावीपणा कमी होतो, असंही संशोधनात समोर आलं आहे. लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनावर किती प्रभावी आहे याबाबत अद्याप जास्त संशोधन झालेलं नाही.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोविशिल्ड (Covishield), फायझर(pfizer) , नोवावॅक्स (Novavax), जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) , मॉडर्ना (Moderna) , वलनेवा (Valneva) आणि क्योरवैक (CureVac) लसीचे बूस्टर डोस अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. या संशोधनामध्ये 2,878 ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांना थकवा, डोकेदुखी आणि लस घेतलेल्या हात दुखणं अशी सामान्य लक्षण जाणवली. काही व्यक्तींवर या लसीचा गंभीर दुष्परिणामही जाणवला. 

संशोधनात असं समोर आलं की, डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 10 ते 12 आठवड्यानंतर सात वॅक्सिनपैकी बूस्टर डोस दिल्यानं प्रतिकारक क्षमता वाढल्याचं समोर आलं. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, बूस्टर डोसचा प्रभाव आगामी काळात कधीपर्यंत राहतो, याबाबत निरीक्षण सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.