अजित पवार यांच्या कुटुंबियांवर सुरु असलेली ‘आयकर’ची देशातील सर्वात मोठी कारवाई : किरीट सोमय्या

वेबसिरीज काढली तर 200 ते 300 कोटींची रॉयल्टी मिळेल

0

पुणे : पवार कुटुंबियांच्या 57 कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहे. अजित पवार आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरु असलेली देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. महारष्ट्रातील ठाकरे आणि पवारांचं सरकार घोटाळेबाज असून अजित पवारांच्या घोटाळ्यावर वेबसिरीज काढायची असेल तर त्यांना 200 ते 300 कोटीची रॉयल्टी मिळेल असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी पवारांवर चौफेर टीका केली. तसेच भिंतीत, बेसमेंट आणि मोकळ्या जागेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काय काय सापडले आहे ते लवकरच कळेल, असेही सोमय्या म्हणाले.

किरीट समय्या म्हणाले, अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा हिशोब मी आज मांडणार आहे. जरंडेश्वर आणि इतर कारख्यान्यात कोणकोण भागीदार आहेत ते मी आज सांगणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे हे न्यायालयानेही सांगितले. या कारखान्यात अजित पवार सर्वेसर्वा होते. अजित पवार यांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली आणि स्वत: तो इतर कंपनीच्या माध्यमातून विकत घेतला.हे सगळं करताना त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

ज्या बेनामी कंपनीने हा कारखाना विकत घेतला, त्यांचे संचालक विजया पाटील, त्यांचे पती मोहन पाटील, दुसऱ्या आहेत निता पाटील या अजित पवारांच्या बहिणी आहे. त्यामुळे संबंध नसताना बहिणींच्या कार्यालयावर छापे टाकल्याचा अजित पवारांचा दावा खोटा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. आपल्या नावे बेनामी मालमत्ता खरेदी करण्यात आली, याची माहिती अजित पवारांच्या बहिणींना नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नीता पाटील, विजया पाटील, मोहन पाटील यांची कल्पतरु ही कंपनी आहे. याची गुंतवणूक अजित पवारांच्या कंपनीत आहे. जरंडेश्वर कारखान्याचे 90 टक्के शेअर्स या ना त्या प्रकारे पवार कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित मंडळींचेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.