पोलीस आयुक्त ऐकत नाहीत….

0

पिंपरी : “पिंपरी-चिंचवडमधील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे ऐकत नाहीत असं माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे सांगत होते. पोलीस आयुक्तांकडे जाताना छाती पुढे करून जा. माझी सत्ता आहे, तू या सत्तेचा नोकर आहेस. माझा मुख्यमंत्री वर बसला आहे. अशी ताकद बाळगा.” असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते भोसरीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते. 

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, आपल्या शहरातील महापौर शिवसेनेचा पाहिजे. आम्ही लढतो, आम्ही लढायला तयार आहोत. भीती वगैरे बाळगायचं कारण नाही. भारतीय जनता पक्ष काय करणार? किंवा पालकमंत्री यांचा दरारा आहे. इथं आमचंही ऐकणार! ”

तसेच, ते पुढे म्हणाले की, “छाती पुढे करून जा महाराष्ट्रात सत्ता आपली आहे. प्रत्येक शिवसेनेच्या मनगटात आणि छातीत हिंमत आहे त्याला सत्ता म्हणतात. पोलीस आयुक्तांकडे जाताना छाती पुढे करून जा. माझी सत्ता आहे, तू या सत्तेचा नोकर आहेस. माझा मुख्यमंत्री वर बसला आहे. ही मनात ताकद हवी.”

Leave A Reply

Your email address will not be published.