चंदेरी दुनियाचे ग्लॅमर; शॉटसाठी गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या लागतात

0

मुंबई : चंदेरी दुनियात तुम्हाला कोणी गॉडफादर मिळालाच दर संधी मिळणं थोडं सोपं होतं. पण जर कोणीच गॉडफादर नसेल तर स्ट्रगल हे आलेच. नशीबाने कधी कोणी संधी दिलीच तर नवीन कलाकार त्या संधीचं सोनं करतात. स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करतात.

अशाच अभिनेत्रीपैकी एक आहे राधिका मदान. राधिका मदानने मोठ्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा तिलाही रिजेक्शनचा सामना करावा लागला. इतकंच काय तर, ती सुंदर दिसत नाही असे म्हणत तिला नाकारले गेले होते. मागे वळून पाहाताना भूतकाळातील काही गोष्टी राधिकाला विसरणंही अशक्यच आहे. दिलेल्या एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला कराव्या लागलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला होता.

“मला पहिल्या शॉटसाठी गर्भनिरोधक गोळी घेण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्याच वेळी माझे आई-वडील मला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीला येत होते. जेव्हा माझ्या वडिलांनी त्या गोळ्या पाहिल्या तेव्हा त्यांच्या पाया खालची जमीनच घसरली होती. त्यांनी कधीही कल्पना आणि विचारही केला नसेल.  राधिकाने सांगितले की, मी पण आतून खूप घाबरले होते. पण नंतर सगळं काही ठिक झालं आणि मला वाटले की शूटिंगनंतर सर्वजण माझ्या पहिल्या शॉटचे कौतुक करतील. पण त्यावेळी असे काहीच झाले नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.