‘या’ कंपनीने दिली गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई

0

मुंबई: शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही एक शास्त्र आहे आणि त्याचबरोबर ही एक कलादेखील आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूक तुम्हाला दणदणीत कमाई करून देऊ शकते. अर्थात शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम क्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मागील वर्षापासून बाजारातील चढउतारांमध्ये काही कंपन्यांनी गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई  करून दिली आहे. अनेकवेळा गुंतवणुकदार स्वस्तातील म्हणजे अत्यंत कमी किंमत असणारा आणि भविष्यात मोठी वाढ होणारा शेअर शोधत असतात. कारण अशा शेअरमध्ये छोट्याशा गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करता येते, मालामाल होता येते. एका टेक्सटाईल कंपनीचा शेअर असाच मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. या कंपनीचे नाव आहे आदिनाथ टेक्सटाइल्स लि. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे जबरदस्त कमाई करत मालामाल झाले आहेत.

फक्त साडेसात महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्सच्या शेअरने गुंतवणुकांचा दणदणीत परतावा दिला आहे. १ जानेवारी २०२१ला आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा शेअर १.७१ रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. सध्या या शेअरची किंमत २२.६५ रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे, तेही फार छोट्याशा गुंतवणुकीद्वारे.

जानेवारी महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा शेअर १.७१ रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करत होता. म्हणजेच जवळपास दीड रुपयांच्या जवळपास. १३ ऑगस्टला या शेअरची किंमत २२.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर जाऊन पोचली आहे. म्हणजेच साडेसात महिन्यात या कंपनीच्या शेअरने जवळपास ११६१.९९ टक्के परतावा आपल्या गुंतवणुकदारांना दिला आहे. गुंतवणुकदारांना या कंपनीने छप्परफाड कमाई करून दिली आहे. जानेवारी महिन्यात या शेअरची किंमत जवळपास दीड रुपया असल्याने फार छोट्याशा गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना मोठी जबरदस्त कमाई करता आली आहे. ज्यांनी जानेवारी महिन्यात आणि त्यानंतरही या शेअरमध्ये वेळोवेळी पैसे गुंतवले असतील ते आज कोट्यधीश झाले असतील. 

आदिनाथ टेक्सटाइल्स लि. ही एक टेक्सटाइल कंपनी आहे. ही कापड व्यवसायातील कंपनी आहे. कंपनी पंजाबमधील लुधियाना येथील आहे.आदिनाथ टेक्सटाइल ही एक सूत गिरणीच आहे. कंपनीची क्षमता ४८०० स्पिंडल्सची आहे. कंपनीने इटली आणि फ्रान्समधून अत्याधुनिक मशिनरी आणून बसवलेली आहे. कंपनीची फॅक्टरी पंजाबमधील लुधियानातील भोलापूर गावी आहे. शुक्रवारी (१३ ऑगस्ट) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार बंद होताना आदिनाथ टेक्सटाइलचा शेअर २२.६५ रुपयांच्या पातळीवर होता आणि या शेअरला अप्पर सर्किट लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.