माजी गृह राज्यमंत्र्यांचे ‘रिव्हॉल्व्हर’ चोरट्यांनी पळविले

0

पुणे : काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैदय स्टेडियम दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही.  त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील  कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन  किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले 1 लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.