उत्तर प्रदेश : भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार समाजवादी पार्टीत

0

लखनऊ : उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात समाजवादी पार्टीला चांगली बळकटी मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. तर भाजपला एकामागे एक असे मोठमोठे झटके बसताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचा लखनऊ येथे एक मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात योगी सरकारमधील 2 मंत्री, 6 आमदार यांच्यासह 12 पेक्षा अधिक माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपला मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे.

After quitting BJP, MLAs Swami Prasad Maurya, Dharam Singh Saini, Bhagwati Sagar and Vinay Shakya join Samajwadi Party in presence of SP chief Akhilesh Yadav pic.twitter.com/Dz6M7yiRSk

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 14, 2022

Former BSP MLA Neeraj Kushawaha Maurya, former BJP MLC Harpal Saini, former BSP MLA Balram Saini, former BJP MLA Rajendra Pratap Singh, former Minister of State Vidrohi Maurya, former Chief Security Officer Padam Singh and former Congress MLA Bansi Singh Pahadiya joins SP today pic.twitter.com/ap6t9E58nz

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 14, 2022

समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले स्वामी प्रसाद मौर्य, धर्म सिंह सैनी, भागवती सांगर आणि विनय शाक्य यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजप आणि बसपाच्या एकूण जवळपास 20 माजी आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला.

#WATCH Who can forget the Digital India error…Raid was supposed to be somewhere else but ended up in their own house.We were waiting for Assembly polls. The Cycle is very strong as Samajwadi and Ambedkarwadi have come together and no one can stop this: SP chief Akhilesh Yadav pic.twitter.com/9YU2ThUAJR

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 14, 2022

यावेळी बोलताना मौर्य यांनी येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 80 विरुद्ध 20 अशी लढाई असल्याचे म्हणत आहेत पण हा त्यांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात 85 आमचे तर उरलेल्या 15 मध्ये अनेक वाटेकरी आहेत, असा टोला मौर्य यांनी लगावला. उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हेच असतील आणि 2024 मध्ये ते देशाचे पंतप्रधानही होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#WATCH BJP wickets falling one after the other, although our CM does not know how to play cricket. As Swami Prasad Maurya said wherever he goes, the government is formed, even this time he brought a huge number of leaders along with him: Samajwadi Party chief Akhilesh Yadav pic.twitter.com/DeLp2Zbdfe

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 14, 2022

यावेळी अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात भाजपच्या विकेटवर विकेट पडत आहेत. अंतिम सामना सुरु झाला आहे. ही आत्मसन्मानाची लढाई आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे आणि ते आता कुणीही रोखू शकत नाही असे त्यांनी म्हटले. योगीबाबांना क्रिकेट खेळता येत नाही. त्यांच्या हातून कॅच सुटला आहे. आता पराभव अटळ आहे. खरंतर येत्या 11 मार्चचं त्यांचं तिकीट होतं. मात्र लखनऊमधील वारे पाहून ते आजच गोरखपूरला निघून गेले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.