‘लोढा बेलमांडो’ सोसायटीच्या निवडणुकीत कोविड नियमांचे उल्लंघन

मतदार यादीत हेतुपुरस्सर अनेकांची नावेच नाहीत

0

पिंपरी : गहुंजे येथील उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या ‘लोढा बेलमांडो’ येथील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आज मतदान होत आहे. या मतदाना दरम्यान सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून याकडे प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न रहिवाश्यांनी उपस्थित केला आहे.

उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या ‘लोढा बेलमांडो’ सोसायटीमध्ये अनेक समस्यांना अगोदरच रहिवाश्यांना सामना करावा लागत आहे. सोसायटी मेंटनन्स वरुन वेगवेगळे मत मतांतर होत आहे. या सोसायटीमध्ये यापूर्वी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. सोसायटीच्या आवारात गोळीबार सारखा भयानक प्रकार घडला होता. यासारखे अनेक प्रश्न उदभवत आहेत.

या सोसायटीमध्ये अतिवरीष्ठ सरकारी अधिकारी, मोठे व्यवसायिक, राजकारणी यांचे वास्तव आहे. यामुळे या सोसायटीमधील निवडणुका हा प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. यासाठी आज सोसायटीमधील टॉवर 3 मध्ये मतदान होत आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे राज्य शासनाने  नियमावली केलेली आहे. गर्दी टाळण्याचे, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. अश्याच या सोसायटीचे मतदान होत आहे. मतदानाचा दरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

सोसायटीचे मतदान होत असताना या ठिकाणी रहिवाशी असणाऱ्या अनेकांची यादीत नावे नाहीत. येथील काहींनी हेतुपरस्पर अनेकांची नावे यादीत समाविष्ट केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याकडे प्रशासन, निवडणूक अधिकारी गांभीर्याने पाहणार का? हे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.