पत्नीची अदलाबदल करणारे ‘सेक्स रॅकेट’ उघड; सात जणांना अटक

0

केरळ : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीची आदलाबदल करणारा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. पत्नीची आदलाबदलकरणाऱ्यांची संख्या दोनचार नाही, तर हजारांहून अधिक आहे. एका महिलेने तिच्याशी सात जणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रारकेल्यावर पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. केरळ पोलिसांनी सात जणांना अटक केली, त्यानंतर मोठी माहिती समोर आलीआहे.

केरळ पोलिसांनी कोट्टायम जिल्ह्यातील करुकाचल पोलिसांनी सांगितले की, सात जणांना अटक करण्यात आली आहे, २५ हून अधिकलोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, या गटांमध्ये हजारहून अधिक जोडपी आहेत आणि ते सेक्ससाठी महिलांची देवाणघेवाण करत होते. आरोपी राज्यातीलतीन जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यभरातील लोक या रॅकेटचा भाग आहेत.

कोट्टायममधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “प्रथम टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुप्समध्ये सामील व्हावे लागत असे आणिनंतर दोन किंवा तीन जोडपी वेळोवेळी भेटत असत. त्यानंतर महिलांची देवाणघेवाण होत असे आणि तीन पुरुष एकावेळी एका महिलेलाशेअर करत असल्याच्याही घटना आहेत.

काही पुरुष पैशासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नींचा वापर करतात. या महिला अदलाबदली करणाऱ्या गटातील लोकांचासखोल तपास सुरू असून, या गटातील सदस्यांचे अन्य कोणत्या गटाशी संबंध आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेपोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.