पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

0

पिंपरी : व्यसन करण्यासाठी पती हा पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करत असे. पैसे न दिल्यास तसेच माहेरहून न आणल्यास तिला मारहाण करत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुदुंबरे मावळ येथे घडली.

विनायक निवृत्ती गाडे (वय 38, रा. सुदुंबरे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय मधू निंबळे (वय 25, रा. लोणावळा) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आहे. तो काहीही कामधंदा करत नव्हता. स्वतःची हौसमौज, चैनी व व्यसनाकरिता तो त्याची पत्नी फिर्यादी यांची बहीण  हिच्याकडे पैसे मागत असे. तिने पैसे न दिल्यास माहेरहून, आईवडील, भाऊ किंवा इतर नातेवाईकांकडून पैसे आणण्यास सांगत असे. पैसे न मिळाल्यास तो फिर्यादी यांच्या बहिणीला हाताने मारहाण करून तिला शिवीगाळ करत छळ करत असे. त्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या ३१ वर्षीय बहिणीने 16 मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.