अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढू शकते.
हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिमेकडील एका वस्तीला लक्ष्य केले आणि हा स्फोट घडवून आणला. दरम्यान, या आत्मघातकी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 46 मुली आणि महिलांचा समावेश असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने युएनच्या अहवाल्याने म्हटले आहे.
काबुलमधील एका शिक्षण केंद्रात झालेल्या दोन दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी सोमवारी आणखी एक आत्मघातकी स्फोट झाला आहे. यावेळी हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिम भागातील हजारा-वस्तीच्या भागाला लक्ष्य केले. शहीद मजारी रोडजवळील पुल-ए-सुख्ता परिसरात हा स्फोट झाला. काबूलच्या पीडी 6 च्या पश्चिमेला दुपारी 2:00 वाजता हा स्फोट झाला, अशी माहिती मिळते आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या स्फोटाबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.