दहशतवादी हल्यात अनेक जवान शहीद

0

नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत फक्त 4 जवान शहीद झाल्याची पुष्टी झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) घेतलीआहे.

या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बलुचिस्तानमध्ये लष्करावर एकूण 16 हल्ले झाले आहेत. एका वृत्तानुसार यामध्ये 37 जवान शहीदझाले आहेत. मात्र, पाकिस्तानी लष्कराने केवळ 19 जवान शहीद झाल्याची माहिती दिली आहे.

शेराणी तहसील अंतर्गत येणाऱ्या दानासर भागात हा हल्ला झाला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, सैनिकांव्यतिरिक्ततीन पोलिसही मारले गेले आहेत. चेकपोस्टवर बॉम्बस्फोट झाला की गोळीबारामुळे सैनिक आणि पोलिसांचा मृत्यू झाला हे अद्यापस्पष्ट झालेले नाही.

डॉनच्या रिपोर्टनुसारहल्ल्यानंतर जवळपास 2 तास गोळीबार सुरू होता. पोलिस आयुक्त बिलाल शब्बीर यांनी चार जवानांच्यामृत्यूची पुष्टी केली. त्या चौकीवर 21 सैनिक तैनात होते. दोन वर्षांपूर्वी या चेक पोस्टलाही लक्ष्य करण्यात आले होते. या गोळीबारातएक दहशतवादीही ठार झाल्याचा दावा काही वृत्तांत करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसारया भागात बीएलएची मजबूत पकड आहे. हा भाग बलुचिस्तानमधील सर्वात मागासलेला भाग आहे. या भागात चिनीनागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. चीनपाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) येथे बांधला जात आहे. मात्र, जवळपास चारवर्षांपासून त्याचे काम बंद आहे. असे असतानाही येथे चिनी नागरिक उपस्थित आहेत. हे मच्छीमार ट्रॉलर्सपासून मजुरांपर्यंत सर्व कामेकरतात. त्यांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानी लष्कराची विशेष तुकडी तैनात आहे. असे असतानाही त्यांच्यावर हल्ले सुरूच आहेत.

गेल्या वर्षी, पाकिस्तानी लष्कराने 10 सैनिकांना ठार केल्याची कबुली त्यांच्या एका अधिकाऱ्याने चुकून मीडियासमोर या हल्ल्याचाउल्लेख करत दिली होती. नंतर या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.