एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

0

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान शपथविधी आधी फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे असणार आहेत. याबाबत घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्याच्या राजकारणात आताही मोठी घडामोड दिसून येत आहे. संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशा मोठ्या चर्चा पसरल्या होत्या. दरम्यान ऐन वेळी राजकारणात नवा ट्विस्ट समोर आल्याचे दिसले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.