मुंबई : औंरग्यांच्या अचानक इतक्या औलादी कशा पैदा झाल्या, याचा आम्ही शोध घेणार आहोत असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत दिला आहे. तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी कोण आहेत, याचा शोध घ्यावा लागेल, आणि त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असे फडणवीसांनी म्हटले आहे.
औंरग्यांच्या अचानक इतक्या औलादी कशा पैदा झाल्या असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे तर याचा शोध घेणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. औंरग्यांच्या औलादींना सोडणार नाही, त्यांचे उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसे झाले तर राग अनावर होतोच असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोण करत आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तर कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन फडणवीसांनी केले आहे.
औरंगजेबाचे उद्दातीकरण खपवून घेतले जाणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, औरंगजेब कोणाला जवळ वाटतो, हे सर्वांना माहित आहे, याची देखील चौकशी केली पाहिजे, असा इशारा देवेंद्र फडवीसांनी केला.
काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी कोण आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. सरकार त्यांच्यावर नक्कीच कारवाई करेल, मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.