इरशाळवाडी दुर्घटना : तिसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरु; आता प्रयत्न 22 मृतदेह आढळले

0

रायगड : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी या गावावर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळली. गुरुवारी पहाटेपासून इथे सुरू झालेले बचावकार्य शुक्रवारीही सुरू होते. गुरुवारी १६ जणांचे मृतदेह सापडले होते, शुक्रवारी आणखी ६ मृतदेह सापडले. बळींची संख्या २२ झाली. पण अजून १०२ रहिवासी ढिगाऱ्याखाली दबून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एनडीआरएफ पथक पहाटे ६ वाजेपासून बचावकार्यात आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अडथळे येत होते. दररोज सायंकाळी ५.३० वाजेनंतर इथे अंधार पडतो, त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले.

शनिवारीही सकाळी ६ वाजेपासून मृतांचा शोध घेण्याचे काम सुरू होईल. या गावची लोकसंख्या २२८ आहे. त्यापैकी ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजून १०२ लोक बेपत्ता आहेत. ७ जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वस्व गमावलेल्या रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ६० कंटेनर आणणार आहेत. ५ हजार फूड पॅकेट्स वाटण्यात आले. लोकांच्या सोयीसाठी २० तात्पुरती शौचालये व २० स्नानगृहे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आली आहेत.

शुक्रवारी ६ मृतदेह सापडले, त्यात ३ महिलांचा समावेश होता. एकूण मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे. त्यात एक चार वर्षांचा तर दुसरा अवघ्या ६ महिन्यांचा मुलगा आहे. एकाच पारधी कुटुंबातील ६ जणांचा मृतात समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.