‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

0

सोलापूर : सोलापूर  भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्विकारला आहे.

दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.  श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी  जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे  स्विकारली होती. मात्र अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  तात्काळ राजीनामा दिला.

व्हिडीओ व्हायरल प्रकरणी श्रीकांत देशमुख यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये  एका महिलेने त्यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीकांत देशमुख दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.