पुणे विभागात प्रथमच सर्वाधिक मतदान

पदवीधरसाठी ५७.९६ तर, शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान

0

पुणे : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. पुणे विभागात पदवीधरसाठी ५७. ९६ तर शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान झाले आहे. बुधवार (दि.३) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु यावेळी उमेदवारांची प्रचंड संख्या,त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळ होण्याची शक्यता आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल १२०० कर्मचारी आणि ७०० पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात पदवीधर मतदार संघासाठी ११२ टेबल व शिक्षकसाठी ४२ टेबल लावण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. दरम्यान मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्याचे राव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.