शेतकऱ्यांच्या समर्थनात अमेरिकेत आंदोलन

भारतीय दूतावासासमोर भारतीय वंशाच्या नागरिकांतर्फे मोर्चा

0

वाॅशिंग्टन ः दिल्लीतील कृषी कायद्याचे पडसाद आता जगभरात उमटत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी मोर्चे काढले आहेत. यामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दुतावासावर काढलेल्या या मोर्चेमुळे बे ब्रिजवर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली होती.

”शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. त्याचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. केंद्राने केलेल्या कायद्यांमुळे काॅर्पोरेट घराण्यांचा फायदा होणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यांमुळे शेती  खासगी क्षेत्रासाठी उघडी करण्यात येणार आहे,” असे मत अमेरिकेतील भारतीय आंदोलकांनी मांडले.

यापूर्वी ब्रिटन आणि कॅनडातीस खासदार व पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन करून शेतकऱ्यांवर झालेल्या कारवाईची निषेध केला आहे. अंहिसा मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलकांवर दडपशाही करणे चूकीचे आहे. प्रत्येकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अशा प्रतिक्रिया जगभरातून उमटत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.