अहमदाबाद ः ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रजाती वाढता प्रभाव पाहून जागतिक स्तरावर हालचालींना वेग आलेल्या आहे. अशात भारतातही इंग्लडवरून येणारी विमाने बंद करण्यात आलेली आहे. मात्र, हा प्रवास तात्पुरता बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशीच अहमदाबादमध्ये ५ प्रवासी करोनासंक्रमित आढळले तर, दिल्लीत ६ आणि कोलकात्यात २ प्रवासी करोना संक्रमित आढळले आहेत.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता लंडनवरून येणारी शेवटची विमाने भारतात आले. एका ब्रिटीश नागरिकासह सर्व पाचही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील कोणाला नव्या विषाणुची बाधा झाली आहे, याची माहिती अद्यापतरी मिळाली नाही. विमानातून उतरलेल्या २७० प्रवाशांची करोना चाचणी करुन घेण्यात आली आहे.