दरडी कोसळल्यामुळे १४९ जणांचा मृत्यू १०० बेपत्ता

0
मुंबई : राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असले तरी अद्यापही किमान १०० जण बेपत्ता आहेत, असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करत सर्वांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकण परिसरातील पूरग्रस्त ठिकाणी जाऊन नागरिकांशी चर्चा केली. स्वतःला संभाळा बाकी सरकार पाहून घेईल असे सांगितले आहे.
राज्यात रायगड, चिपळूण यासह सातारा जिल्ह्यात पाटण, महाबळेश्वर या तालुक्यात दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अनेकजण दगावले असून बेपत्ता आहेत. प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.