मराठा क्रांती मोर्चाच्या मूक आंदोलनास १५ आमदारांचा पाठिंबा

0

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज नाशिक येथे मूक आंदोलनास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजी राजे या आंदोलनात सहभागी होणार असून नाशिकमधील १५ आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

अनेक आंदोलकांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली आहे. आंदोलनस्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत.

काही वेळातच छत्रपती संभाजी राजे आंदोलनस्थळी पोहचणार आहेत. ते दुपारी १ वाजेपर्यंत येथे आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनस्थळी येणार्‍या आंदोलकांसाठी नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एका ठिकाणी करण्यात आली आहे.

या आंदोलन स्थळावर आता आमदार व लोकप्रतिनिधी येण्यास सुरुवात झाली आहे. आमदार नितीन पवार आणि आमदार राहुल ढिकले यांचे मूक आंदोलनस्थळी आगमन झाले आहे. रयत क्रंती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या मूक आंदोलनस्थळी आगमन झाले आहे.

या आंदोलनात पुरुषांबरोबरच महिला, तरुणींही सहभागी झाल्या आहेत. अनेक महिला काळ्या साडी नेऊन आलेल्या दिसून येत आहेत.

nnashik
Leave A Reply

Your email address will not be published.