134 कोटी रुपयांच्या 2 हजाराचा नोटा बँकेत जमा

'या' जिल्ह्यात 15 दिवसात जमा झाल्या नोटा

0

सोलापूर : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा‎ जमा करण्यास सांगितल्यानंतर १५‎ दिवसांतच शहरातील बँकांकडे ६ लाख‎ ७० हजार ४५६ नोटा जमा झाल्या.‎ नागरिक १३४ कोटी ९ लाख रुपये जमा‎ करून त्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटा‎ घेऊन गेले.

 

७ जूनपर्यंत पहिल्या १५‎ दिवसांत इतकी मोठी रक्कम जमा‎ झाल्याने उर्वरित साडेतीन महिन्यांत‎ आणखी मोठी रक्कम जमा होण्याची‎ शक्यता आहे. चलनात असलेल्या २‎ हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने २३ मे‎ ते ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याचे‎ आदेश दिले. त्यानुसार नोटा जमा झाल्या.‎

२ हजार रुपयांच्या १० नोटा बँकेत जमा‎ करून त्या बदल्यात १०० वा ५००‎ रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत.‎ पण त्यासाठी कोणत्याही बँकेत गर्दी‎ दिसत नाही. शहरातील प्रमुख‎ बँकांकडे २ हजार रुपयांच्या नोटा‎ जमा केल्या जात आहेत.

यामध्ये स्टेट‎ बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र‎ बँक, बडोदा बँकेसह इतर बँकांमध्ये‎ ही मोठी रक्कम जमा झाली आहे.‎ रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नोटा‎ जमा करून घेतल्या जात असल्याचे‎ अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत‎ नाशिककर यांनी सांगितले.‎

Leave A Reply

Your email address will not be published.