भाजपच्या 21 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

0

भुसावळ : भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. काल पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलं. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की खानदेश विभागातील ५२ कशी सोनेची पारख राष्ट्रवादी काँग्रेसला समजली. नाथाभाऊ यांनी माझ्या व जयंत पाटील यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असे म्हटले. तसेच नाथाभाऊ यांनी खानदेश जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचे यावेळी सांगितले. हे तर ट्रेलर आहे आगे आगे देखो होता है क्या…. असा इशारा खडसे यांनी भाजपला दिला आहे.

एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला अशी चर्चा खानदेशात सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.