मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून याप्रकरणी एसआयटीची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना आज केली. एनसीबीतील २४ बोगस प्रकरण बाहेर काढणार असल्याचा ‘बॅाम्ब’ मलिक यांनी आज टाकला. ते माध्यमांशी बोलत होते.
”मी एनसीबी यंत्रणेच्या विरोधात नाही, यातील काही व्यक्ती या बनावट खटले दाखल करुन दिशाभूल करीत आहेत. माझ्याकडे २४ केसेसचे डिटेल्स आहेत, यातील एक-एक केस कशी बोगस आहे, याची माहिती मी पुढील काळात देणार आहे. आम्ही या यंत्रणेच्या विरोधात नाही, यातील बोगस लोकांना खरा चेहरा समाजासमोर आणणार आहे, एनसीबीमधील बोगस व्यक्तींचा माहिती देणार आहोत,”
समीर वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवली. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या कंपनीत बिल्डर पैसा टाकत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ‘मागास प्रवर्गातील उमदेवाराचा अधिकार फसवेगिरी करून हिसकावण्यात आली. वानखेडेंच आयुष्य फसवणुकीच्या गोष्टींनी सुरु झालं आहे आणि ते आता फसवेगिरी करत आहेत. बोगस केसेस तयार करणं. लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करणे. तो पैसा बिल्डराच्या माध्यमातून नियमित करणं. काही बिल्डर यांच्या (समीर वानखेडे) नव्या पत्नीच्या (क्रांती रेडकर) कंपनीत पैसे टाकतात. हवाल्याच्या माध्यमातून पैसा पाठवला जातो’, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
वानखेडे म्हणाले की, समीर दाऊद वानखडे ही बोगस व्यक्ती असून त्यांनी जन्म दाखल्यात फेरफार करुन केला आहे. त्याच्या आधारे त्यांनी जातीचा दाखला काढला आहे.
या जातीच्या दाखल्यांच्या आधारे वानखेडेंनी आयआरएस (IRS)मध्ये नोकरी मिळविली आहे. यामुळे दलित उमेदवाराला त्याचा अधिकारापासून वंचित ठेवलं आहे. धर्मांतर करुन वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला मिळविला आहे.
त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करुन नाव बदललं नंतर ते दुरुस्त केलं. वानखेडेंचे संपूर्ण आयुष्य एक बनावट गोष्टींनी सुरु झाली आहे. आताही ते बनावट प्रकरणं बनवित आहेत. त्यांनी आणखी काय बनावट प्रकरणं समोर आणणार आहोत. इनामदार अधिकारी इतका का घाबरत आहेत.
सुरवातीला काही जण हिंदू-मुस्लीम करत होते. नवाब मलिक मुस्लीम, आर्य खान मुस्लीम यावरुन हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण केलं जात होतं. जन्मापासून आजपर्यंत समीर वानखेडे मुस्लीम आहेत. त्यांचा जन्माचा दाखला मी प्रसिद्ध केला आहे. हा शोधायला बरेच परिश्रम करावे लागले. त्यांच्या बहिणीचा ऑनलाईन दाखवला मिळतो. त्यात के वानखेडे शब्द वापरले आहेत. दाऊद वानखेडे धर्मांतर केल्यानंतर त्यांनी नाव बदललं होतं. त्याच्या आधारे जन्माचा दाखला काढण्यात आला. नंतर त्यात खोडाखोड सुरु करण्यात आली. इथूनच वानखेडेंची बोगसगिरी सुरु झाली आहे, असे मलिकांनी सांगितले.