माण तालुक्यातील २७ गावे अजूनही ‘लॉक’च

0

दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुका अंशतः अनलॉक झाला असला तरी पंधरापेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित असलेली २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून, ती अजूनही लॉकच आहेत.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण माण तालुक्यात अंशतः निर्बंध हटवले गेले आहेत, असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे सोमवारी बहुतांशी गावात वर्दळ वाढलेली दिसून आली. खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले. मात्र, २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. हे समजल्यानंतर संबंधित गावे बंद करण्यासाठी संबंधित गावांतील प्रशासन सरसावले.

२७ पैकी २१ गावे ही एक जून रोजीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती. दहिवडी, म्हसवड, बिदाल, मार्डी, वावरहिरे, पळशी, आंधळी, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, मलवडी, गट्टेवाडी, वर मलवडी, भालवडी, शिंदी खुर्द, शिंगणापूर, बोडके, जाशी, परकंदी, राणंद, वडगाव व अनभुलेवाडी ही ती गावे आहेत. सात जून रोजी शेनवडी, महाबळेश्वरवाडी, वाघमोडेवाडी, गोंदवले खुर्द, कारखेल व राजवडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.