पिंपरी : गुंतवलेली रक्कम ट्रेडिंग मध्ये न वापरता तिचा गैर वापर करत दोघांची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2 जून 2021 ते शनिवार (दि.3) या कालावधीत चिखली येथे घडला आहे.
याप्रकरणी अरुणोदय हरिदास चोरगे (29, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली असून नितीन विश्वनाथ करळे, तुषार ज्ञानेशवर शिवेकर व महिला आरोपी, प्रविण राठोड (जाई स्टॉक ट्रेडिंग, कस्पटेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे साथीदार सुभाष निवृत्ती कोल्हे यांना आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच दोघांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांनी गुंतवलेली रक्कम केवळ ट्रेडींगमध्ये गुंतवणार असल्याचे सांगितले. बँके पेक्षा जास्त परतावा देऊ असे आमिष दाखवले.
काही काळ व्याज व मुद्दलीचा काही भाग फिर्यादी व त्यांच्या साथीदाराला ही दिला, मात्र त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. तसेच अग्रीमेंट मध्ये लिहून दिले असतानाही गुंतवणूक ट्रेडींगमध्ये न करता त्याचा अन्य ठिकाणी विनीयोग करत फिर्यादी व त्यांच्या साथीदाराची 31 लाख 1 हजा ररुपयांची फसवणूक केली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.