कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पांढरेवाडी ( ता पंढरपूर ) येथील पिंपरकर कुटुंबावर कोरोनाने घाला घातला आहे. एकाच घरातील 4 जणांचा बळी घेतला आहे. कुटुंबातील एका विवाहित बहिणीचा ही मे महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पांढरेवाडी येथील पिंपरकर कुटुंब शेती आणि व्यवसाय करून आनंदाने जीवन चरीतार्थ चालवत होते. जांबुवंत पिंपरकर हे कुटुंबियातील कर्ता होते. जांबुवंत यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि विवाहित बहिणी असा परिवार सुखसंपन्न आहे.

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जांबुवंत यांची सुरवड (ता. इंदापूर ) येथे दिलेली बहीण सुवर्णा बनसुडे कोरोना बाधित झाल्या. त्यांचा 6 मे रोजी मृत्यू झाला. दरम्यान जांबुवंत यांनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने 10 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सर्व पिंपरकर कुटुंब कोरोना बाधित निघाले.

या कालावधीतच जांबुवंत यांचे चुलते पोपट पिंपरकर यांचे 31 मे रोजी कोरोनाने निधन झाले. त्यानंतर जांबुवंत यांची आई चिंगाबाई पिंपरकर यांचा 9 जून रोजी कोरोनाने मृत्यू झाला. तर पत्नी चिंगाबाईच्या पाचव्या दिवशी जांबुवंतचे वडील बजरंग पिंपरकर यांच्यावर कोरोनाचा आघात झाला.

वडिलांचा तिसऱ्या दिवशीच जांबुवंत पिंपरकर (39 वर्षे ) यांच्यावरही कोरोनाने घाला घातला. अवघ्या 17 दिवसांत घरातील 4 माणसे मृत्युमुखी पडल्याने कुटुंब कोरोनाने उध्वस्त झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.