रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर कारवाई
जळगाव : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर मात्र पोलिसांनी कारवाई करत दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केली आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणासाठी दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली होती याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके यांचा समावेश आहे.