मुंबई : राज्याचं वातावरण गेल्या तीन दिवसांपासून अगदी ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं काय होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या आगामी रणनीती आखण्यात येतील,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “जी काही मॅजिक फिगर लागते त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. राज्यपालांना पत्र पाठवण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.” तसेच, ”आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर आहे. पवारांच्या इशाऱ्याला आम्ही घाबरत नाहीत. लोकशाहीमध्ये असा दबाव काम करत नाही. कायद्याला महत्त्व आहे. आमच्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. एक नोटिस काय १० नोटिसा आल्या तरी भीक घालत नाही. तुम्ही मायनॉरिटी मध्ये आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्याचा काही अधिकार नाही.”
दरम्यान, “आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिंदे गट आता निर्णय काय घेणार? आणि महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? याचीच चर्चा राज्यासह देशभर पसरली आहे.