मुंबई : राज्यात डेल्टा प्लस वेगाने पसरत आहे. डेल्टा प्लसच्या नवीन रुग्णांनी 60 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात 14 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही या व्हॅरिएंटचे रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी 14 नव्या केसेस सापडल्या आहेत.
डेल्टा प्लसने आतापर्यंत 34 रूग्ण संक्रमित झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत. अशाप्रकारे, देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांती संख्या 66 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही हा नवा व्हॅरिएंट असण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. या आठवड्यात या चार राज्यात डेल्टा प्लस आहे की नाही, हे कळू शकेल.