मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनच्या हालचाली सुरु आहेत. तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात आपण पाहिले तर 15 दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून, त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो. कोरोनाची साखळी तोडणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू असतो. परिस्थितीत सुधारणा होणे गरजेचे आहे.
तसेच जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो, असेही ते म्हणाले.