राज्यात किमान 15 दिवसांचा असेल लॉकडाऊन : आरोग्य मंत्री

0

जालना : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचे का ? यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली असून अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेणार आहेत. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावे लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत मांडले. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. संसर्ग झालेला एक रुग्ण 25 जणांना बाधित करतो. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात तरुण, लहान मुले बाधित होत आहेत.त्यामुळे एकमुखाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.