कोण आहेत हे मिया जमालखान…अन का जातायत सर्व पोलीस ठाण्यात

वाचा सविस्तर...

0

पिंपरी : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांकडे काही माहिती विचारल्यास सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगितले जाते. अनेक वरीष्ठ अधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून काम करत असतात, मात्र परस्थिती वेगळीच असते. अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी वेषांतर करुन कारवाई करतात हे आपण चित्रपटात पाहतो.

पिंपरी चिंचवड शहरात असेच काहीशी घडले आहे … पिंपरी चिंचवड चे खुद्द पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश वेषांतर करून शहरात फिरत आहेत. तर त्यांच्या सोबत सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे याही होत्या. त्यामुळे नसते उद्योग करणाऱ्यांचे पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सध्या शहरामध्ये कोरोनाने जसा उचांक गाठलाय तसेच या महामारीत आपला हाथ साप करून घेणाऱ्यांची देखील मजल वाढलीये. त्याच अनेक काळे धंदे करणाऱ्यांच्या अनेक गोष्टी या आयुक्तांच्या कानावर गेल्या आणि त्यांनी हि अनोखी युक्ती लढवली आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते… स्वतः कृष्ण प्रकाश हे त्यांच्या पिळदार मिशीमुळे ओळखले जातात… रात्री त्यांनी मिया सारखी दाढी चिटकवली…डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला…मेकअप आर्टीस्टने त्यांचा गेटअप, लूक पुरता बदलून टाकला… सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क… बरोबर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या… खासगी टॅक्सी करून ही मियाबिवीची जोडी प्रथम रात्री १२.१५ वाजता पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली… आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८००० रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते आले.. ‘रुग्णवाहिका वाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तुम्हा तक्रार दाखल करून घ्या’, असा आग्राह या जोडीने धरला होता… सामान्य माणसाला यायचा तोच अनुभव दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनाही आला… “हे आमचे काम नाही”, म्हणून त्यावेळी हजर पोलिसाने थेट आयुक्तांनाच आला… कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून त्याला ओळख दिल्यावर त्या पोलिसाची अक्षरशः ततंरली…

रात्री १.३० वाजता हिंजवडी पोलिस स्टेशन आणि नंतर मध्यरात्री २ वाजता वाकड चौकीवर आले… त्या ठिकाणी “आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो…, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो… काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला…”, अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गाँभिर्याने सर्व प्रकऱणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली, आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली. हा सगळा ड्रामा झाल्यावर पोलिसा आयुक्तांनी आपली ओळख दाखविल्यावर तो कावराबावरा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.