पैश्यांच्या गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र योजना

0

नवी दिल्ली : जर आपणही पैशांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील तसेच मॅच्युरिटीनंतर दुप्पट परतावा देखील मिळेल. ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना आहे.

किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, जिथे निश्चित कालावधीत आपले पैसे दुप्पट केले जातात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. याच्या मॅच्युरिटीचा कालावधी सध्या 124 महिने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे.

कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही. ही योजना विशेष शेतकऱ्यांसाठी तयार केली गेली आहे जेणेकरून ते त्यांच्या पैशाची दीर्घकाळ बचत करू शकतील.

किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आहे. यामध्ये सिंगल अकाउंट व्यतिरिक्त, जॉईंट अकाउंटची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्याची देखभाल पालकांनी करावी. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF किंवा NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूकीसाठी 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ती खरेदी करता येतील.

आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP चा व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे आपली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा कालावधी 124 महिन्यांचा आहे. ही योजना आयकर कायदा 80 C अंतर्गत येत नाही. त्यामुळे परत आलेल्या परताव्यावर टॅक्स आकारला जाईल. या योजनेत TDS कपात केली जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.