कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; 12 तासात 88.7 मिलिमीटर पावसाची नोंद

0
सातारा : राज्यातील अनेक भागात मान्सून चे आगमन झाले आहे  मात्र काही ठिकाणी अद्याप पाऊसाचा थेंबही पडलेला नाही. असे असताना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 88.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. मात्र माण खटाव तालुक्यात अद्याप पाऊस पडलेला नाही. बुधवारी रात्री कराड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. एक जून नंतर तालुक्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद झाली असून, तालुक्यातील सर्व विभागांचा विचार करता तालुक्यात सरासरी 88.7  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सुपने आणि कोपर्डे हवेली मंडल विभागात पावसाने जवळपास शतक गाठले आहे. गुरुवारी सकाळी आठनंतरही पावसाचा जोर कायम असून संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील कराड मंडल विभागात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कराड 95.00 मिलिमीटर, मलकापूर मंडल विभागात 93.00 मिलिमीटर, सैदापूर मंडल विभागात 90.00 मिलिमीटर, कोपर्डे हवेली मंडल विभागात 98.00 मिलिमीटर, मसुर मंडल विभागात 75.00 मिलिमीटर, उंब्रज मंडल विभागात 85.00 मिलीमीटर, शेणोली मंडल विभागात 88.00 मिलिमीटर, कवठे मंडल विभागात 82.00 मिलिमीटर, काले मंडल विभागात 80.00 मिलिमीटर, कोळे मंडल विभागात 87.00 मिलिमीटर, उंडाळे मंडल विभागात 85.00 मिलिमीटर, सुपने मंडल विभागात 99.00 मिलिमीटर आणि इंदोली मंडल विभागाचा 88.00 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्व मंडल विभागात एकूण 1145.00 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 88.07 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.