मराठा आरक्षण मूक मोर्चा आंदोलन एक महिन्यासाठी पुढे

0

नाशिक : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मूक आंदोलन स्थगित नाही. पण मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सारकाने 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आले असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. नाशिक येथे आज झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजेंनी ही घोषणा केली.

संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाने पाच ठिकाणी मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरचे आंदोलन झाल्यानंतर सरकारबरोबर आमची भेट झाली.  त्यावेळी सरकारने आमच्याकडे 21 दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही तो दिला आहे. सरकारच्या वतीने येत्या गुरुवारी मराठा आरक्षणासाठी पुर्नविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आयोग स्थापन करू नका पण गृहपाठ तरी करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले  तसेच मूक आंदोलन स्थगित नसून या काळात आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये समन्वयकांशी चर्चा करणार आहोत, असेही सांगितले.

सारथी विषयक झालेल्या चर्चे बाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, सारथीला स्वायत्तता मिळणार आणि सारथीला 21 दिवसात मोठा निधी जाहीर करणार असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागितलं. सारथीच्या आठ विभागीय कार्यालयांना सरकारने मंजुरी दिली आहे. कोल्हापूरला तातडीने उपकेंद्र सुरु केलं जाणार आहे. यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जमिनीची पाहणी देखील केली. आता आम्ही सगळे जागेची पाहणी करुन जागा निश्चित करु.

Leave A Reply

Your email address will not be published.