मुंबई : आपल्या आधारकार्ड वरुन कोणी सिम कार्ड घेऊन, वापर करत आहे का ? हे आता तुम्हाला पाहता येणार आहे. कारण एका आधार कार्डवरून 18 फोन कनेक्शन (सिम कार्ड) घेता येऊ शकतात.
TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार यापूर्वी एका आधारवरुन नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. आता एका आधार कार्डवर 18 सिम कार्ड खरेदी करता येतात. बिजनेसमुळे ज्या लोकांना अधिक सिमकार्ड लागतात त्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नऊऐवजी ही संख्या 18 सिमपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
हे जाणून घेण्यासाठी, आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.
या नंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.
त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.
आता तिथेView More पर्यायावर क्लिक करा.
येथे Adhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोट एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.
आता इथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.
आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.
आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.
असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.
येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.