नवी दिल्ली : शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज असतात. जोपर्यंत कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज शरीरात राहतात तोपर्यंत विषाणूचा धोका कमी होतो.
इटलीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजबद्दल मोठी माहिती दिली आहे. मिलानमधील सॅन राफेल रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये तयार झालेल्या एंटीबॉडीज रुग्णांचे वय किंवा आजार असूनही रक्तात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूपच कमी होतो.
इटलीच्या आयएसएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी या अभ्यासासाठी कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या सुमारे १६२ रुग्णांची निवड केली. त्यांचे रक्ताचे नमुने प्रथम मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते.
यानंतर, कोरोनाची लढाई जिंकलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. संशोधकांनी असे म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील आठ महिन्यांपर्यंत या रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज आढळले.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)