इगतपुरीतील बंगल्यावर रेव्ह पार्टी; 22 जणांवर कारवाई; 4 अभिनेत्रींचा समावेश

0

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियम लागू असताना इगतपुरीतील एका बंगल्यात पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘डीजे’च्या तालावर, मद्यधुंद अवस्थेत अभिनेत्रीसह इतर तरुणी आणि तरुण थिरकताना आढळून आले. अनेक संशयास्पद वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

इगतपुरीत आज पहाटेच्या सुमारास  मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर रेव्ह पार्टीची गुप्त बातमी मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड मारून केली कारवाई केली.

या ठिकाणी रेव्ह पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश होता.एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.