‘डेल्टा प्लस’च्या 21 रुग्णापैकी एकाच रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतला होता

0

मुंबई : राज्यात प्लस विषाणू वेगाने पसरत आहे. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहे, त्यापैकी नुकताच एक रुग्ण दगावला आहे. या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती उजेडात आली आहे.

दुसरी लाट ओसरत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकारात डेल्टा प्लस विषाणूने चिंतेत भर टाकली आहे. जगात सध्या सर्वात जास्त चिंता डेल्टा विषाणूबाबत व्यक्त केली जात आहे. त्याच्याच परावर्तित प्रकाराचे म्हणजे डेल्टा प्लसचे 21 रुग्ण राज्यात आहेत. त्यापैकी सर्वात अधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव येथे असून काही रुग्ण मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, “राज्यातील या सर्व डेल्टा प्लस बाधित 21 रुग्णांवर आरोग्य व्यवस्थेचे लक्ष असून सर्व रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामध्ये असे लक्षात आले आहे कि या 21 रुग्णांपैकी मुंबई स्थित एकाच रुग्णाने लसीचा एक डोस घेतला होता. बाकीच्या अन्य 20 रुग्णांनी कोणतीही लस घेतली नव्हती.

या 21 पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, ती महिला डॉक्टरांना उपचारकरिता कोणतेतही सहकार्य करत नव्हती. त्यांच्यावर मानसिक आरोग्याचे उपचार सुरु होते. इतर सर्व 20 रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असून सर्व रुग्णांची तब्बेत स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.