मराठी तरुणीचा अमेरिकन शेअर बाजारात ‘डंका’

0

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक या शेअर बाजारात गुरुवारी (24 जून) लिस्ट झाली. 36 डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे (IPO) 828 दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचं मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर एवढं झालं. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास 25 टक्के वाढ झाली आणि ते मूल्य 45.02 डॉलर प्रति शेअर एवढं झालं. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी IPO आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे – पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी आहे.

कंपनीचं भांडवली बाजारमूल्य 11.4 अब्ज डॉलर एवढं झालं. या घटनेचं महत्त्व काय, हे सांगणारी गोष्ट पुढेच आहे. या घटनेमुळे या कंपनीच्या तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या मुलीचं नाव आहे नेहा नारखेडे (Neha Narkhede). कंपनी स्थापन केल्यापासून सात-आठ वर्षांत हे यश त्यांना मिळालं आहे.

‘फोर्ब्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार, जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज आदींचं व्यवस्थापन सोपं होण्याच्या दृष्टीने या तिघांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं एक टेक्निकल टूल 2011मध्ये विकसित केलं. एवढ्या प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या डेटाचं व्यवस्थापन (Data Management) ही केवळ Linkedin चीच नव्हे, तर अन्य कंपन्यांपुढचीही समस्या असू शकते, असा विचार त्या तिघांनी केला. त्यातून त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) विकसित केलं आणि 2014मध्ये त्याकरिता कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी उभारली. नेहा नारखेडे ही त्या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच तंत्रज्ञानविषयक मुख्य अधिकारी आहे.

‘सीएनबीसी डॉट कॉम’ने काही कालावधीपूर्वी नेहाचा प्रेरक प्रवास उलगडणारा लेख प्रसिद्ध केला होता. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रांत महिलांना कर्तृत्व गाजवणं अवघड असतं. कारण त्यांना संधीच मिळणं कठीण असल्याने स्वतःला सिद्ध करून दाखवणं त्याहून अवघड असतं. तंत्रज्ञान हे असंच पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र.

Leave A Reply

Your email address will not be published.