52 प्रवाशांच्या जीवाशी खेळ; एसटी चालक, वाहक निलंबीत

0
रायगड : मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून एसटी बस घालणं पिंपरी चिंचवड आगाराचे चालक आणि वाहकाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड डेपोची MH-14 BT-4578 क्रमांकाच्या एसटी बस पाण्यात घातली होती.

अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. असं असताना एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई सकंटात नेयी, अशी परिस्थीती होती. दरम्यान, प्रवाशांचा जीव धोक्यात घालत्या प्रकरणी आता एसटीचा चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोकणामध्ये 5 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याने दिला आहे. 11 जुलै पासुन कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुरुड, रोहा, अलिबाग, श्रीवर्धनमध्ये अनेक ठिकाणी नदीनाले तुडूंब भरुन वाहु लागले आहेत. 11 जुलै रोजी रात्री अलिबाग-मुरुड मार्गावरील काशिद जवळ छोटा ब्रिज कोसळुन मुख्य मार्ग बंद होऊन मुरुड तालुक्याचा जवळचा सपंर्क तुटला होता. तर महाड परिसरात 11 आणि 12 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.
12 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड डेपोची MH-14 BT-4578 क्रमांकाच्या एसटी बस चालक विजयकुमार रामचंद्र जाधव आणि वाहक अशोक लक्ष्मण दराडे यांनी 52 प्रवाशी असलेली वेळास-रत्नागिरीकडे जाणारी एसटी महाड तालुक्यातील रेवतळे फाटा इथून वेळासकडे जाताना पाण्यातून घातली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे ही बाब समोर आलीय. त्यानंतर रायगड जिल्हा परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी बसचे चालक आणि वाहक यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.