अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये तक्रार

0
बीड : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनाने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्रा बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकावर वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूरने नुकतेच ‘प्रेग्नसी बायबल’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला आहे.
करीना कपूरने आपल्या पुस्तकावर बायबल शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
याबद्दल बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. करीना कपूरविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या तक्रारीबद्दल अद्याप करीना कपूर आणि पुस्तक प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.